छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वढू-तुळापूर येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन

0
61

पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त त्यांच्या श्री क्षेत्र वढू बु. येथील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दर्शन घेऊन अभिवादन केले.

यानंतर तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळी जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पुण्यतिथीनिमित्त आयोजित मुकज्योत पदयात्रेतही त्या गावकऱ्यांसमवेत सहभागी झाल्या.

या प्रसंगी परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती. संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here