‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

0
72
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : वारी, पंढरपूर आणि श्री विठ्ठलाच्या भक्तीपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे, पंढरपूरच्या वारीचे तसेच श्री विठ्ठलाच्या आराधनेतून उमटणाऱ्या सांस्कृतिक प्रतिबिंबाचे दर्शन घडते. तीर्थ आणि त्या तीर्थातील देव या दोन्हींचे महत्त्व अधोरेखित करत त्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि परंपरा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मांडण्यात आली आहे. आकर्षक छायाचित्रे आणि माहितीपूर्ण लेखनामुळे हे कॉफीटेबल बुक संग्रहणीय ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सुंदर पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, पुस्तकाचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here