मालमत्ता व्यवहारांना चालना; सार्वजनिक सुट्यांनाही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

0
52
मालमत्ता व्यवहारांना चालना; सार्वजनिक सुट्यांनाही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू
मालमत्ता व्यवहारांना चालना; सार्वजनिक सुट्यांनाही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू
आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्ता व्यवहारांना चालना; सार्वजनिक सुट्यांनाही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

मुंबई, प्रतिनिधी :
आर्थिक वर्ष संपत आल्याने तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक तसेच साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहणार आहेत.

याशिवाय, या कालावधीत कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी, अभिलेखांची पूर्तता, तसेच चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुलीची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालये आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील सुरू राहणार आहेत. यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कार्यालयांचाही समावेश आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने संबंधित पक्षकार, मालमत्ता व्यवहार करणारे नागरिक, तसेच दस्त नोंदणीशी संबंधित व्यावसायिक यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

या निर्णयामुळे आर्थिक वर्षाअखेरीस रखडलेले मालमत्ता व्यवहार पूर्ण करण्यास मदत होणार असून, शासनाच्या महसूल वसुलीलाही चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here