हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा बहुमान
पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी २०२६’ या प्रतिष्ठेच्या कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकत त्यांनी ‘डबल महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब मिळवला आहे.
हर्षवर्धन सदगीर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नाशिकच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग उत्कृष्ट कामगिरी, जिद्द आणि दमदार खेळीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ही मानाची गदा उंचावली. राज्यातील कुस्तीप्रेमींसाठीही ही स्पर्धा विशेष ठरली असून, हर्षवर्धन यांच्या यशाने महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती परंपरेला नवे बळ मिळाले आहे.


