अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो FIR दाखल

0
62
अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो FIR दाखल
अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो FIR दाखल

अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो FIR दाखल

मुंबई : अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी महाराष्ट्रात FIR दाखल होऊन न्याय मिळू शकला नसला, तरी सोमवार, २३ मार्च रोजी कर्नाटकमधील एका पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. याबद्दल त्यांनी कर्नाटक पोलिसांचे आभार मानले आहेत.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आता या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून FIR चा तपास कोणत्या पद्धतीने केला जातो, याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. हा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल झाला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

अजितदादांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना, मग ती कितीही मोठी शक्ती असो, शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला. “महाराष्ट्र धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून, त्या शिकवणुकीनुसार आम्ही काम करत राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून आता महाराष्ट्र पोलीस या FIR वर पुढे कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here