अधिवेशनाच्या अखेरीस भावनिक निरोप; शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपणार

0
21
अधिवेशनाच्या अखेरीस भावनिक निरोप; शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपणार
अधिवेशनाच्या अखेरीस भावनिक निरोप; शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपणार

अधिवेशनाच्या अखेरीस भावनिक निरोप; शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपणार

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आज विधान परिषदेतील सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी आपला अनुभव व्यक्त करत हा क्षण भावनिक आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले.

मे २०२६ मध्ये विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केणेकर यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की, चार वेळा विधानसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर शरद पवार आणि स्व. अजित पवार यांच्या विश्वासामुळे विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल ते त्यांचे ऋणी आहेत.

विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये काम करण्याचा अनुभव लाभल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, विधान परिषद हे त्यांचे आवडते सभागृह राहिले. कमी सदस्यसंख्येमुळे शेतकरी, कामगार, तरुण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी येथे मिळाली. तसेच प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्याची मोकळीकही अनुभवता आली.

आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत, वक्तृत्व आणि आक्रमकता यांचा योग्य वापर करता आल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रवासात सहकार्य, मार्गदर्शन आणि साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here