Animal Husbandry Department Maharashtraचे ‘महापशुधन वार्ता’ ई-मासिक ठरतंय पशुपालकांसाठी मार्गदर्शक
मुंबई : Animal Husbandry Department Maharashtraच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
या ई-मासिकामधून पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण आणि विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.
पशुसंवर्धन सचिव Dr. Ramaswamy N यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली असून, आतापर्यंत ११ अंक प्रकाशित झाले आहेत. या मासिकात राज्यभरातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या उपक्रमांची माहिती समाविष्ट केली जाते.
विशेष म्हणजे, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक Mahavistar App या ॲपवरही वाचण्यासाठी उपलब्ध झाले आहे.
याबाबत Pankaja Munde यांनी सांगितले की, “पशुपालन आणि दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे ई-मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे.”
‘महापशुधन वार्ता’ हे ई-मासिक ग्रामीण भागातील पशुपालकांना माहिती, प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे दिसून येत आहे.


