Sindhudurg districtमध्ये आंबा-काजू शेतीसाठी AI प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांची निवड

सिंधुदुर्ग : Sindhudurg district जिल्ह्यात आंबा आणि काजू शेती अधिक आधुनिक व उत्पादक बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा Nitesh Rane यांनी केली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आंबा व काजूसाठी प्रत्येकी २०० अशा एकूण ४०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
या संदर्भात एडीटी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीतर्फे सादरीकरण करण्यात आले. यावेळी Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeethचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कृषी व नवोपक्रम संचालक डॉ. भूषण गोसावी, तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
मंत्री Nitesh Rane म्हणाले की, प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा मूलभूत डेटा संकलित करून त्यांच्या शेतीचे डिजिटायझेशन करण्यात येईल. प्रारंभी २०० शेतकऱ्यांमध्ये प्रकल्प राबवून त्यानंतर मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येईल.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या प्रकल्पात शेतीमध्ये सेन्सर्स बसवून माती, झाडांची स्थिती आणि उत्पादनाचे सतत परीक्षण केले जाणार आहे. शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण व जागरूकता दिली जाईल. १५० दिवसांचा पहिला टप्पा ठेवण्यात आला असून २०-२५ शेतकऱ्यांच्या गटांमध्ये प्रशिक्षण सत्रे घेण्यात येणार आहेत.
ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केल्यास पारंपरिक ४-५ दिवसांचा वेळ वाचून काही तासांत काम पूर्ण होणार आहे. तसेच AI आधारित प्रिडिक्टिव्ह मॉडेलमुळे पिकांवरील रोगांचा आधीच अंदाज घेता येणार असून, कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी होऊन ब्लॅक मार्केटिंगवरही नियंत्रण येणार आहे.
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सिंधुदुर्गातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


