Bank of India पुरस्कृत RSETI रायगडकडून ‘फास्ट फूड स्टॉल उद्यमी’साठी मोफत प्रशिक्षण

0
59

अलिबाग : व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी Bank of India पुरस्कृत Rural Self Employment Training Institutes (RSETI) रायगडतर्फे ‘फास्ट फूड स्टॉल उद्यमी’ या विषयावर मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असून, १२ दिवसांचा कालावधी असणार आहे. प्रशिक्षण दररोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत पंतनगर, अलिबाग येथे घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान सहभागी उमेदवारांना मोफत निवास आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्र शासनाच्या Ministry of Rural Development मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येईल.

या प्रशिक्षणामध्ये फास्ट फूड व्यवसाय उभारणी, व्यवस्थापन, स्वच्छता, ग्राहक सेवा आणि उद्योजकतेचे मूलभूत धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

इच्छुक उमेदवारांनी खालील Google फॉर्म लिंकद्वारे नाव नोंदणी करावी:
https://forms.gle/225dAK5nwRcUNxYb7

अधिक माहितीसाठी ‘स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड (RSETI)’ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here