WWF Indiaची ‘वन प्लॅनेट अकॅडमी’ सुरू; पर्यावरण शिक्षणासाठी मोफत ऑनलाइन कोर्सेस

0
45

नवी दिल्ली : पर्यावरण आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी WWF Indiaने ‘One Planet Academy’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि नागरिकांना निसर्ग, हवामान बदल आणि शाश्वततेविषयी सखोल माहिती देणारे मोफत ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या उपक्रमात इंटरॲक्टिव्ह शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला असून, ‘Climate & Nature Courses’, ‘Interactive Learning’ आणि ‘Free Access’ ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, कोर्स पूर्ण करणाऱ्या सहभागींसाठी मोफत प्रमाणपत्रांचीही सुविधा देण्यात आली आहे.

‘वन प्लॅनेट अकॅडमी’च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सुलभ आणि आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना WWF कडून विशेष बक्षिसे (goodies) देण्यात येणार आहेत.

हा उपक्रम Capgeminiच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, पर्यावरण विषयक शिक्षण अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे.

इच्छुकांनी ‘Sign up Now’द्वारे नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here