Kokan: थकबाकीदारांच्या मालमत्ता सील

0
50
कर विभाग,वेंगुर्ला नगरपरिषद,
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत ८ मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत. नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करूनही कर न भरणा-या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाकडून पाणीपट्टी भरणा­यांची नळ कनेक्शन तोडण्यात आलेली आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-जागतिक-वन-व-चिमणी-दिन-साज/

शहरातील मालमत्ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप केलेली असल्याने कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सोईसाठी ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन सुट्टीच्या कालावधीत कर भरणा करण्याकरीता नागर सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. कर भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

फोटोओळी – शहरातील थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here