पंजाब अँड सिंध बँक स्थानिक बँक मध्ये १,००० स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती
२० एप्रिलपर्यंत अर्ज
नवी दिल्ली : Punjab and Sind Bankने JMGS-I स्तरावर ‘लोकल बँक ऑफिसर’ (LBO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून एकूण १,००० रिक्त पदांसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही भरती राज्यनिहाय (State-specific) असून संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेचे प्राविण्य उमेदवारांसाठी अनिवार्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२६ आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रवर्गनिहाय अटी, आरक्षण तसेच भाषिक प्राविण्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.


