शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी विभागाला दीड कोटींचे उत्पन्न

0
11
शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी विभागाला दीड कोटींचे उत्पन्न
शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी विभागाला दीड कोटींचे उत्पन्न

शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी विभागाला दीड कोटींचे उत्पन्न

९३१ एसटी बसेस धावल्या

रत्नागिरी (प्रतिनिधी): शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी विभागाच्या एसटी प्रशासनाला यंदा मोठा आर्थिक लाभ झाला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तब्बल ९३१ एसटी बसेस विविध ठिकाणी धावल्या असून या सहलींमधून विभागाला १ कोटी ५९ लाख ४८ हजार २३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

हिवाळी हंगामात शाळा व महाविद्यालयांकडून शैक्षणिक तसेच ऐतिहासिक सहलींचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. यंदा शासनाच्या निर्देशानुसार सहलींसाठी एसटी बसेसचा वापर करण्यावर भर देण्यात आला होता. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी ‘लालपरी’ला मोठी पसंती दिल्याचे दिसून आले.

या सहलींसाठी रत्नागिरी विभागातील नऊ आगारांतून विशेषतः नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परिणामी, हजारो किलोमीटरचा प्रवास करत ९३१ बसेस धावल्या आणि विभागाच्या उत्पन्नात मोठी भर पडली.

या उत्पन्नामुळे रत्नागिरीसह एकूण आठ आगारांना आर्थिक दिलासा मिळाला असून एसटी प्रशासनाच्या तिजोरीत भर पडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शाळा-महाविद्यालयांकडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे पुढील काळातही अशाच उपक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here