आपल्या अभिनयाने गेली ३० वर्षे रंगभूमीची सेवा करणारे हरहुन्नरी कलावंत आणि ज्येष्ठ रंगकर्मी राजन काजरोळकर यांना शनिवार दि.१८ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील जवाहरलाल नेहरू सभागृहात भव्य समारंभात आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचे खूप खूप अभिनंदन . आपले मनोगत व्यक्त करताना राजन काजरोळकर म्हणाले, माझ्या कलेला मिळालेला सन्मान पाहून आजवर केलेल्या कामाची , अभिनयाची पोचपावती जणू मिळाली. या पुरस्कारासाठी त्यांनी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानले . अशा पुरस्काराने काम करायला अधिक बळ येते . यापुढेही चांगलं काम करत राहण्यासाठी बळ मिळत राहो, हीच इच्छा.
वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना आंतर शालेय स्पर्धेत अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आणि तिथूनच त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला आणि त्यांना डॉ.श्रीराम लागू यांच्या सोबत काम करण्याचीही संधी मिळाली .
आतापर्यंत त्यांनी अनेक मराठी ,हिंदी नाटके, मालिका ,वेबसिरीज, लघुपट ,ऍड फिल्म ,म्युझिक अल्बम मध्ये कामे केली आहेत.
त्यांनी अभिनीत केलेले विनिता पिंपळखरे लिखित, दिग्दर्शित “संधिकाली या अशा” या एकपात्री बहुरूपीचे प्रयोग जोरात सुरू आहेत .त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रयोगासाठी संपर्क ९८२०९२३८९७