कोकण रेल्वेच्या २६३ कि.मी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरु

0
8

– खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत ३७७ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्याला रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांची लेखी उत्तराद्वारे माहिती.
– १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत उपस्थित केला होता मुद्दा

मुंबई :

कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्याच प्रवास जलद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संपूर्ण कोकण रेल्वेचा मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्ग क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने सुमारे 263 कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे लेखी उत्तर रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंह यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांना पाठवले आहे.

खासदार वायकर यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत नियम ३७७ अन्वये कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर राज्यमंत्री यांनी हे उत्तर दिले. कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ची स्थापना भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्यातील रोहा ते कर्नाटक राज्यातील ठोकूरपर्यंत सुमारे 740 किलोमीटर लांबीच्या कोंकण रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जुलै 1990 मध्ये करण्यात आली. सध्या कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रेल्वे मंत्रालयामार्फत भारत सरकारची 66.35% भागीदारी आहे, तर महाराष्ट्र सरकारची 15.11%, कर्नाटक सरकारची 10.30%, गोवा सरकारची 4.12% आणि केरळ सरकारची 4.12% भागीदारी आहे. कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण हे वरील सर्व भागधारक राज्य सरकारांच्या संमतीवर अवलंबून असल्याचे राज्य मंत्री यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोंकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील 740 मार्ग किलोमीटरपैकी रोहा–वीर आणि मडगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here