गोव्याच्या साध्वी सैलचा ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ किताबावर कब्जा

0
10

मुंबई : प्रतिनिधी
गोव्याच्या साध्वी सैल हिने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ हा मानाचा किताब पटकावत देशभरात आपली छाप पाडली आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे तिने हा प्रतिष्ठेचा मुकुट आपल्या नावावर केला.

या स्पर्धेत राजनांदिनी पवार हिने प्रथम उपविजेती तर श्री अद्वैता हिने द्वितीय उपविजेतीचा मान मिळवला. तिन्ही विजेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी आपल्या कौशल्याने आणि आत्मविश्वासाने परीक्षकांची मने जिंकली.

साध्वी सैलच्या या यशामुळे गोवा राज्याचा गौरव वाढला असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here