पनवेल स्थानकावर लिफ्ट बिघाड; चार प्रवासी अडकले, सर्वांची सुखरूप सुटका

0
7

नवी मुंबई : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल रेल्वे स्थानक येथे आज सकाळी फलाट क्रमांक ७ वरील प्रवासी लिफ्टमध्ये बिघाड होऊन ती अचानक कोसळल्याची घटना घडली. लिफ्टचा दरवाजा सरकल्यामुळे त्यामध्ये चार प्रवासी अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, लिफ्टच्या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून, अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here