‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला २५ एप्रिलपासून प्रारंभ
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत भव्य आयोजन
मुंबई : प्रतिनिधी
‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या जलयात्रेचा शुभारंभ २५ एप्रिल २०२६ रोजी होणार असून राज्यभरात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा घेत ही जलयात्रा विविध ठिकाणी मार्गक्रमण करणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
राज्यातील जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.


