BPCL मध्ये २५० एन्ट्री लेव्हल पदांची भरती; १७ मेपर्यंत अर्जाची संधी

0
56

मुंबई : प्रतिनिधी
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने २०२६ साठी २५० एन्ट्री लेव्हल पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, असोसिएट एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील BPCL च्या विविध युनिट्स, कार्यालये आणि ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. ही भरती मोहीम तरुण उमेदवारांसाठी करिअरची उत्तम संधी मानली जात आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १८ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १७ मे २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अनुभव आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधी सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here