NIC मध्ये २४३ ‘Scientist B’ पदांची भरती

0
47
NIC मध्ये २४३ ‘Scientist B’ पदांची भरती
NIC मध्ये २४३ ‘Scientist B’ पदांची भरती

NIC मध्ये २४३ ‘Scientist B’ पदांची भरती

२४ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज

नवी दिल्ली : प्रतिनिधी
राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत २४३ ‘Scientist B’ (गट-अ, राजपत्रित) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध तांत्रिक शाखांमधील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २७ मार्च २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२६ आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील विविध सरकारी प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण आणि इतर पात्रता निकषांची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेतून तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here