केसरकरांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा; तिलारी-विंगुर्ला पाणी योजनेस गती

0
51
केसरकरांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा; तिलारी-विंगुर्ला पाणी योजनेस गती
केसरकरांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा; तिलारी-विंगुर्ला पाणी योजनेस गती

केसरकरांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा; तिलारी-विंगुर्ला पाणी योजनेस गती

सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध योजनांवर चर्चा होऊन विकासकामांना गती देण्याचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसिलदार ओंकार ओतारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तिलारी ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तातडीने पुढे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्थेचा मार्ग मोकळा होणार आहे.

तसेच, सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या इमारतीसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातील रस्ते विकासालाही प्राधान्य देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

क्रीडा क्षेत्रालाही चालना देत वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुलात नवीन रनिंग ट्रॅक उभारणे व आधुनिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. सावंतवाडी व दोडामार्ग क्रीडा संकुलांसाठी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल आणि विविध मैदानांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचाही निर्णय झाला.

तिलारी पाणीपुरवठा योजनेतून सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन, कुंभार्ली, ब्राह्मणपाट आणि मळगाव या भागांना पाणीपुरवठा करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here