मालवणात शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा

0
66
मालवणात शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा
मालवणात शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा

मालवणात शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा

मालवण : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण शाखेत शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

या वेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी संघटक दीपा शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक महेश जावकर, उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे खान, पायल आढाव, उपशहरप्रमुख सदा लुडबे, प्रमोद करलकर, पूजा करलकर, चिंतामणी मयेकर, दीपा जावकर, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, किशोर गावकर, सुरेश मडये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवजयंती निमित्ताने सामाजिक व धार्मिक उपक्रमांना चालना मिळाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here