लोणेरेतील अत्याचार प्रकरणावर संताप; आरोपीला फाशीची मागणी, बंदचा इशारा

0
56

रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला माणुसकीला काळिमा फासणारी म्हणून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. संबंधित आरोपीला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात राष्ट्रीय छावा संघटना यांनी तीव्र भूमिका घेतली असून, लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास माणगाव तालुका बंदची हाक देण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here