मोरबे धरणात केवळ ४३% पाणीसाठा; ७ ऑगस्टनंतर टंचाईचा इशारा

0
48
मोरबे धरणात केवळ ४३% पाणीसाठा; ७ ऑगस्टनंतर टंचाईचा इशारा
मोरबे धरणात केवळ ४३% पाणीसाठा; ७ ऑगस्टनंतर टंचाईचा इशारा

मोरबे धरणात केवळ ४३% पाणीसाठा; ७ ऑगस्टनंतर टंचाईचा इशारा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईसह खारघर व कामोठे परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण येथे पाणीसाठा धोकादायक पातळीवर घसरला असून सध्या केवळ ४३ टक्के साठा शिल्लक आहे. हा साठा फक्त १०३ दिवस पुरेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर ७ ऑगस्टनंतर धरण कोरडे पडण्याची आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.

पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याबरोबरच आरोग्यविषयक अडचणी आणि आर्थिक फटका बसण्याचा धोका वाढला आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

“पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here