महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन

0
52
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन

रायगड : Maharashtra Day निमित्त १ मे रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी Manuj Jindal यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन नियोजनाबाबत बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी २३ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी नगरपालिकेने पाणीपुरवठा, जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिका, क्रीडा विभागाने ध्वनी व्यवस्था, तर Maharashtra State Electricity Board (एमएसईबी) ने अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी ८.०० वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे होणार असल्याने जिल्ह्यातील इतर कार्यालयांनी सकाळी ७.१५ ते ९.०० या वेळेत कोणतेही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नयेत. स्वतःचे ध्वजवंदन करावयाचे असल्यास ते सकाळी ७.१५ पूर्वी किंवा ९.०० नंतर आयोजित करावे.

ध्वजवंदनाच्या वेळी सावधान स्थितीत ‘वंदे मातरम्’ म्हणावे/वाजवावे. त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणावे/वाजवावे आणि लगेच राज्यगीत सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

या सूचनांची माहिती ग्रामीण भाग, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवून त्यांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here