‘महालक्ष्मी सरस २०२६’ : मुंबईत ग्रामीण संस्कृतीचा उत्सव पुन्हा सज्ज!
मुंबई : मुंबईकरांनी आतुरतेने वाट पाहिलेला ‘महालक्ष्मी सरस’ भव्य प्रदर्शन व विक्री सोहळा यंदाही रंगणार आहे. Mahalaxmi Saras 2026 या प्रदर्शनातून ग्रामीण भारताची अस्सल चव, हस्तकला आणि संस्कृती शहरात अनुभवता येणार आहे.
ग्रामीण महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, हातमागावरील उत्पादने, घरगुती मसाले, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक कलाकुसरींचा खजिना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. गावरान चवींचा आस्वाद आणि खरेदीचा अनोखा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
📅 तारीख : ०२ मे ते १४ मे २०२६
⏰ वेळ : सकाळी १०.०० ते रात्री १०.००
📍 स्थळ : MMRDA Grounds, मैदान क्रमांक १ आणि २, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), वांद्रे (पूर्व), मुंबई
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील उत्पादकांना मोठे व्यासपीठ मिळणार असून, शहरातील ग्राहकांना थेट गावाशी जोडण्याची संधी मिळणार आहे. “गावाकडची मायेची उब” अनुभवण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस २०२६’ला नक्की भेट द्या!


