रत्नागिरी जि.प.ची काम वाटप समिती सभा ५ मे रोजी

0
15
रत्नागिरी जि.प.ची काम वाटप समिती सभा ५ मे रोजी
रत्नागिरी जि.प.ची काम वाटप समिती सभा ५ मे रोजी

रत्नागिरी जि.प.ची काम वाटप समिती सभा ५ मे रोजी

१० लाखांखालील कामांचे वाटप

रत्नागिरी : Ratnagiri जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठी काम वाटप समितीची महत्त्वाची सभा मंगळवार, ५ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा दुपारी १२.०० वाजता Kai Shamrao Peje Sabhagruha येथे पार पडणार असल्याची माहिती सदस्य सचिव, काम वाटप समिती तथा कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग यांनी दिली आहे.

या बैठकीत रुपये १० लाखांपर्यंतच्या विविध विकासकामांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेषतः मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते (विद्युत) आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते (स्थापत्य) यांच्यासाठी कामांचे वाटप होणार असल्याने संबंधितांमध्ये उत्सुकता आहे.

या प्रक्रियेमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here