मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

0
3
मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

‘बकासुर’ बैल ठरणार मुख्य आकर्षण

पोईप (प्रतिनिधी) : Malvan तालुक्यातील मालोंड माळ येथे शनिवार, २ मे रोजी दुपारी २ वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैलगाडा स्पर्धक सहभागी होणार असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणून ‘बकासुर’ बैल पाहायला मिळणार असून बैलगाडा प्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. ‘झोकदार झकास’ बैलगाड्यांची रंगतदार झुंज ही स्पर्धेची आणखी एक खासियत ठरणार आहे.

विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ३५,००० रुपये व मानाची ढाल, द्वितीय क्रमांकासाठी २५,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी २०,००० रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी १७,००० रुपये व मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत. याशिवाय पाचव्या ते पंधराव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांनाही रोख पारितोषिके व मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून, मोठ्या संख्येने बैलगाडा शौकिनांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here