बारावीचा निकाल आज जाहीर; गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज

0
7
बारावीचा निकाल आज जाहीर; गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज
बारावीचा निकाल आज जाहीर; गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज

बारावीचा निकाल आज जाहीर; गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज

मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल आज, २ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार असून राज्यातील सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी मुंबई विभागातून तब्बल ३ लाख ५० हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

विद्यार्थ्यांना आपला निकाल Digilocker तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच ‘यश-अपयशाची पेटी’ उघडणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, निकालाबाबत काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना ३ मे ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेपासून निकालापर्यंतचा प्रवास आज संपणार असून, पुढील शैक्षणिक वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा या निकालातून निश्चित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here