दुसरी, तिसरी, चौथीसह आता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमालाही मंजुरी

0
39
दुसरी, तिसरी, चौथीसह आता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमालाही मंजुरी
दुसरी, तिसरी, चौथीसह आता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमालाही मंजुरी

दुसरी, तिसरी, चौथीसह आता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमालाही मंजुरी

मुंबई : राज्यात इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीचा नवीन अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत असून, आता इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here