सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

0
34
सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येथे नेहमीच पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. सद्यस्थितीत उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी असल्याने येणा-या पर्यटकांचे जास्त प्रमाण आहे. मुंबई-पुण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांचे जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची मागणी लक्षणीयरीत्या वाढत असून त्याचा नियमित पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास प्राधान्याने व नियमित इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत संबंधित ऑईल कंपन्यांच्या डेपो मॅनेजरांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते नियोजन व समन्वय राखण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर बीपीसीएल (BPCL) एचपीसीएल (HPCL) व आयओसीएल (IOCL) या ऑईल कंपन्यांचे डेपो मॅनेजर व विक्रय प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तृप्ती धेडमिसे यांच्या सूचनेनुसार मिरज येथील पेट्रोलियम इंधन डेपो मॅनेजर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डेपोमध्ये सध्या इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, सिंधुदुर्गात आवश्यक असलेली अतिरिक्त पेट्रोलियम इंधन मागणी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यास तयार असल्याचे डेपो मॅनेंजर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावर प्रशासन लक्ष ठेवून असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here