मुंबई-ठाण्यात धुळीच्या वादळाचा तडाखा
अनेक भागांत अंधार, हाय अलर्ट जारी
मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात अचानक आलेल्या तीव्र धुळीच्या वादळामुळे अनेक भागांमध्ये अंधार पसरला आणि दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली.
Thane, Dombivli, Kalyan, Bhiwandi, मिरा रोड, नायगाव, मुलुंड आणि Navi Mumbai परिसरात धुळीचे दाट तपकिरी ढग पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी या धुळीच्या वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.
दरम्यान, Navi Mumbai International Airport परिसरातही काही काळ धुळीच्या वादळाचे साम्राज्य पाहायला मिळाले.
हवामान विभागाने मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देत मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.


