CRPF मध्ये ९,१९५ कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती
१९ मेपर्यंत अर्जाची संधी
नवी दिल्ली : Central Reserve Police Force (CRPF) ने कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन) आणि पायनियर विंग पदांसाठी ९,१९५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील ही मोठी भरती मोहीम देशभरातील पात्र उमेदवारांसाठी राबविण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये कॉन्स्टेबल टेक्निकल अँड ट्रेड्समन पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ९,१७५ जागा तर पायनियर विंगसाठी फक्त पुरुष उमेदवारांसाठी २० जागांचा समावेश आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे रहिवासी असलेले पात्र भारतीय नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरती प्रक्रियेत शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि बहुस्तरीय निवड प्रक्रिया असणार आहे. उमेदवारांनी वयोमर्यादा, वेतनश्रेणी, शारीरिक निकष आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


