युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये १,८६५ अप्रेंटिस पदांची भरती
१९ मेपर्यंत अर्जाची संधी
मुंबई : Union Bank of India ने ‘युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती २०२६’ अंतर्गत १,८६५ रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध शाखांमध्ये अप्रेंटिस पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत नवीन पदवीधर उमेदवार (पुरुष व महिला) या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून अर्ज करताना NATS नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून पात्र उमेदवारांना १९ मे २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतभरातील विविध ठिकाणी नियुक्ती दिली जाईल.
पदनिहाय रिक्त जागा, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धतीविषयीची सविस्तर माहिती उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


