करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये ५३४ पदांची भरती
१९ मेपर्यंत अर्जाची संधी
नाशिक : Currency Note Press Nashik (CNP) अंतर्गत ५३४ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. SPMCIL अंतर्गत ही भरती अधिकारी, पर्यवेक्षक, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, कलाकार आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी, डिप्लोमा, ITI किंवा संगणक ज्ञानासह पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना १९ मे २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती India Security Press, Bank Note Press, तसेच Security Printing Press यांसारख्या SPMCIL च्या विविध युनिट्समध्ये केली जाणार आहे.
उमेदवारांनी पदनिहाय पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


