कुडाळ हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.५५ टक्के; सुधांशू धुरी शाळेत प्रथम
कुडाळ : कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चा दहावीचा निकाल यंदा ९८.५५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील सुधांशु महेश धुरी याने ९९.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
मुलींमध्ये समृद्धी विलास सरनायक हिने ९८ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले. तसेच आर्या लक्ष्मण आगलावे आणि वरदा भाग्यविधाता वारंग यांनीही ९८ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. आयुषीने सगुण केळुस्कर ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी शाळेतून २०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
संस्कृत विषयात सुधांशु महेश धुरी, समृद्धी विलास सरनायक, आर्या लक्ष्मण आगलावे , वरदा भाग्यविधाता वारंग यांच्यासह सात विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले.
या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक व. म. वरदे, पर्यवेक्षक र. द. तेली, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


