शिवाजी मेमोरियल हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षेत ९३ टक्के निकाल
कणकवली – शिवाजी मेमोरियल हायस्कूल चा यंदाचा निकाल विद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा उत्कृष्ट प्रत्यय देणारा ठरला आहे.
यंदा परीक्षेला प्रविष्ट झालेल्या १८६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी प्रशालेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध अभ्यास पद्धती आणि शिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनाची साक्ष देणारी ठरली आहे.
पूर्वा संतोष सावंत हिने ४८७ गुणांसह प्रथम क्रमांक, मुग्धा विकास साईल हिने ४७९ गुणांसह द्वितीय क्रमांक, मनाली प्रसन्न देसाई हिने ४७३ गुणांसह तृतीय क्रमांक, वैष्णवी कृष्णा कोळेकर हिने ४७२ गुणांसह चतुर्थ क्रमांक, भार्गव भरत काणेकर याने ४६८ गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त करून प्रशालेच्या यशात मोलाची भर घातली आहे.संस्कृत विषयात पूर्वा संतोष सावंत, मुग्धा विकास साईल, मनाली प्रसन्न देसाई आणि वैदेही रविराज प्रधान यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय प्राविण्य संपादन केले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच मुख्याध्यापक जी. एन. बोडके सर, संस्थेचे पदाधिकारी आणि समर्पित शिक्षकवृंद यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणा यांचे मोलाचे योगदान आहे. कणकवली शिक्षण संस्था चे चेअरमन डॉ स. सी . सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष Dr. एस .एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम . ए . काणेकर तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


