श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचा सलग १४ वा १०० टक्के निकाल

0
37
शिवाजी मेमोरियल हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षेत ९३ टक्के निकाल
शिवाजी मेमोरियल हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षेत ९३ टक्के निकाल

श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचा सलग १४ वा १०० टक्के निकाल

कुडाळ :श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे या विद्यालयाने मार्च २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत सलग १४ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले. यंदा परीक्षेला बसलेले सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विद्यालयातील निरीजा सुशीलकुमार घाडी हिने ८९.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आर्या मंगेश पात्रे हिने ८९.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर दिनेश दीपक वर्क याने ८६.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे हे यश शक्य झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष विनोद गोसावी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here