राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राची देशात बाजी

0
31
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राची देशात बाजी
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राची देशात बाजी

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राची देशात बाजी

जलसमृद्ध आणि बालस्नेही गटात प्रथम क्रमांक

नवी दिल्ली : केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा मिळवला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांवर आधारित विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने देशात आपला ठसा उमटवला आहे.
भंडारा जिल्ह्यातील Itgaon (Pu.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर रायगड जिल्ह्यातील Kharivali ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत प्रथम स्थान मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
याशिवाय नाशिक जिल्ह्यातील Nimble ग्रामपंचायतीला ‘सुशासन’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळाला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील Chambharli ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ विभागात द्वितीय स्थान पटकावत ३७.५ लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे.
हे पुरस्कार ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ आणि ‘नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत दिले जात असून, ०३ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
गरिबी निर्मूलन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सुशासन आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर आधारित पंचायत प्रगती निर्देशांक (PAI 2.0) नुसार या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here