यशदामध्ये लोकसभा सचिवालयाच्या अधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम

0
34

यशदा आणि लोकसभा सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा सचिवालयातील ४० अधिकाऱ्यांसाठी ११ ते १५ मे २०२६ दरम्यान क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यशदाचे मानव विकास केंद्र आणि PRIDE (Parliamentary Research and Training Institute for Democracies) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ११ मे रोजी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लोकसभा सचिवालयाच्या PRIDE चे उपसंचालक डॉ. साई दिनेश शेट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सत्रसंचालक म्हणून हेमंत कुलकर्णी, तर सत्र समन्वयक म्हणून विनय कुलकर्णी काम पाहत आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे लोकसभा सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कौशल्यवृद्धी, संशोधन क्षमता आणि लोकशाही व्यवस्थेतील कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here