पिस्तुलाचा धाक दाखवून ७० लाखांची चोरी; पोलिसांकडून ७२ तासांत आरोपी जेरबंद

0
30

अकोला येथे पिस्तुलाचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹६९.९० लाखांचा ऐवज चोरी झाल्याची तक्रार अकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाला वेग दिला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध भागांतील तब्बल ५८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.

तपासादरम्यान पोलिसांनी अंदाजे ७०० किलोमीटरचा प्रवास करत आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या ७२ तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

आरोपीकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या जलद कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here