स्व-गणना २०२७ साठी शेवटचे ४ दिवस

0
37
स्व-गणना २०२७ साठी शेवटचे ४ दिवस
स्व-गणना २०२७ साठी शेवटचे ४ दिवस

स्व-गणना २०२७ साठी शेवटचे ४ दिवस

१५ मेपूर्वी माहिती भरण्याचे आवाहन

भारताच्या लोकसंख्येची अचूक माहिती संकलित करण्यासाठी सुरू असलेल्या स्व-गणना (जनगणना २०२७) मोहिमेला आता अंतिम टप्पा गाठला असून, नागरिकांकडे केवळ ४ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

केंद्र शासनाकडून स्व-गणनेसाठीचे अधिकृत पोर्टल खुले करण्यात आले असून, १५ मे २०२६ पर्यंत प्रत्येक कुटुंबाने आपली माहिती ऑनलाइन भरून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“तुमची माहिती, तुमचे भविष्य” या संदेशासह नागरिकांनी जबाबदार भूमिका घेत स्व-गणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

स्व-गणनेसाठी अधिकृत पोर्टल : se.census.gov.in
अंतिम मुदत : १५ मे २०२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here