सैनिकी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरु, अंतिम मुदत 20 जून.

0
30
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरु, अंतिम मुदत 20 जून.
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरु, अंतिम मुदत 20 जून.

सैनिकी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरु, अंतिम मुदत 20 जून.

रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचे अधिपत्याखालील चिपळूण येथील सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतीगृह मध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, प्रवेश पुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली आहे.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २० जून असून सर्व युद्ध विधवा / इतर माजी सैनिक विधवा / माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी यांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

चिपळूण येथील सैनिकी मुलांचे व मुलींच्या वसतिगृहमध्ये प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.

शिल्लक राहीलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील. वसतिगृहासाठी प्रवेश फी प्रति महिना सेवारत असलेल्या सैनिकांच्या वर्गातून अधिका-यांच्या पाल्यांना ३,५०० रुपये, जेसीओच्या पाल्यांना ३,००० रुपये तर शिपाई किंवा एनसीओ यांच्या पाल्यांसाठी २,८०० रुपये असेल. माजी सैनिकांच्या वर्गातून अधिकाऱ्यांच्या पाल्यांना ३,००० रुपये, जेसीओ च्या पाल्यांना 2 हजार 800 रुपये तर शिपाई किंवा एनसीओ यांच्या पाल्यांना 2 हजार 500 रुपये फी आहे.

युध्द विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांना वसतिगृहात नि:शुल्क प्रवेश असणार आहे.

सामान्य विद्यार्थ्यांना ३,५०० रुपये फी आहे. प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम १,००० रुपये आकारण्यात येईल.

प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यातआलेले आहेत.

वसतिगृह प्रवेशासाठी प्राधान्यक्रमाने युद्ध विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये त्यानंतर अनुक्रमे पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये.), बी.एड. / डी. एड., पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे), बारावी, अकरावी व दहावी प्रमाणे (गुणवत्ता यादीप्रमाणे), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असलेस सिव्हिलियन पाल्य (मा. संचालकांच्या परवानगीने) याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक योगेश बने (मो. नं. ९८६७०६२०१९) व

मुलींचे वसतिगृह साठी चौकशी करण्यासाठी वसतिगृह अधिक्षिका श्रीमती. सविता गायकवाड (मो. नं. ८३९०६७५९०२) यांच्याशी संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here