टाटा मोटर्सची Altroz iCNG AMT भारतात लॉन्च; 5 स्टार सुरक्षिततेसह दमदार फीचर्स
मुंबई : Tata Motors ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक Tata Altroz iCNG AMT ची नवीन CNG AMT आवृत्ती भारतीय बाजारात सादर केली आहे.
भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅकपैकी एक मानल्या जाणाऱ्या Altroz ला आता AMT आणि iCNG तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने ग्राहकांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे.
ग्राहकांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे.
या नवीन मॉडेलची प्रमुख वैशिष्ट्ये:
▪️ अत्यंत सहज आणि आरामदायी AMT ड्रायव्हिंग अनुभव
▪️ थेट CNG वर स्टार्ट होण्याची सुविधा
▪️ प्रगत ‘Twin-cylinder’ iCNG तंत्रज्ञान
▪️ कोणतीही तडजोड न करता 210 लिटरची बूट स्पेस
कंपनीने ही CNG AMT आवृत्ती Pure, Pure S, Creative, Creative S आणि Accomplished S या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध करून दिली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित मॉडेल्सना 2025 मध्ये 5 Star GNCAP सुरक्षा मानांकन प्राप्त झाले असून त्यामुळे सुरक्षिततेच्या बाबतीतही Altroz अधिक विश्वासार्ह ठरते.


