राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल विनोद तावडे यांचा कणकवलीत सत्कार
Vinod Tawde यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने प्रहार भवन, Kankavli येथे स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार Narayan Rane यांच्या हस्ते विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला.
कोकणचे सुपुत्र असलेले विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेचे कार्य प्रभावीपणे सांभाळत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामध्ये तावडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही नमूद करण्यात आले.
तावडे यांच्या रूपाने कोकणाला लाभलेले राज्यसभेचे खासदार हे संपूर्ण कोकणासाठी सुवर्णकाळ ठरेल. कोकणातील लोकप्रतिनिधी विविध स्तरांवर प्रभावीपणे कार्यरत असल्याने कोकणाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


