इंधन बचतीचा सल्ला जनतेला; मग नेत्यांनीही एसटीने प्रवास करावा !
इंधन बचतीचा सल्ला जनतेला; मग नेत्यांनीही एसटीने प्रवास करावा !
देशात इंधन बचतीबाबत जनजागृती केली जात असताना सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र दुसरीकडे आमदार आणि खासदारांसाठी एसटी बसमध्ये राखीव सीट क्रमांक १ आणि २ ठेवण्यात आलेल्या आहेत, याकडे आता पुन्हा लक्ष वेधले जात आहे.
“जनतेने इंधन वाचवावे, सार्वजनिक वाहतूक वापरावी, पण नेत्यांनी स्वतः किती वेळा एसटी बसने प्रवास केला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोठमोठे ताफे, अनेक गाड्या आणि व्हीआयपी संस्कृती यावर टीका करत काही नागरिकांनी सुचवले की, लोकप्रतिनिधींनी अधूनमधून एसटी बसने सामान्य जनतेसोबत प्रवास केल्यास इंधन बचतीसोबतच जनतेशी थेट संवादही साधता येईल.
टी बसने सामान्य जनतेसोबत प्रवास केल्यास इंधन बचतीसोबतच जनतेशी थेट संवादही साधता येईल.
तसेच अनेकदा असेही निदर्शनास येते की, सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा सामान्य जनतेसाठी असतात; मात्र राजकीय नेते सार्वजनिक वाहतूक वापरत नाहीत, सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत आणि आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिक्षणही देत नाहीत. यावरून सामान्य करदात्या जनतेला मिळणाऱ्या सुविधांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
“ज्या जनतेकडून कर वसूल केला जातो, त्या जनतेसाठी निर्माण केलेल्या व्यवस्थांवर लोकप्रतिनिधींनाच विश्वास नसेल, तर त्या सुविधांची वास्तविक स्थिती काय आहे?” असा प्रश्नही आता चर्चेत येऊ लागला आहे.