भरडखोल मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

0
9
भरडखोल मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
भरडखोल मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
भरडखोल मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

रायगड :  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री.नितेश राणे,(Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shrivardhan) तालुक्यातील भरडखोल येथील महत्त्वाच्या मासेमारी बंदराच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते व खासदार Sunil Tatkare यांची प्रमुख उपस्थिती होती. मच्छीमारांना सुरक्षित, आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भरडखोल येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विकासकामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक मच्छीमार बांधवांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मत्स्य विभागासाठी वार्षिक १,२४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासारख्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मच्छीमारांना करण्यात आले.

कार्यक्रमास स्थानिक कोळी बांधव, ग्रामस्थ आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here