आदिवासी व डोंगराळ भागांना शैक्षणिक बळ

0
37
आदिवासी व डोंगराळ भागांना शैक्षणिक बळ
आदिवासी व डोंगराळ भागांना शैक्षणिक बळ

आदिवासी व डोंगराळ भागांना शैक्षणिक बळ

१७ नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता

सिंधुदुर्ग :
राज्यातील आदिवासी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी १७ नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय State Higher Education and Development Commission यांच्या बैठकीत घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली असून सिंधुदुर्ग अभ्यास केंद्रासाठी नवीन अभियंत्रिकी महाविद्यालय, बी.व्होक (B.Voc) अभ्यासक्रम महाविद्यालय तसेच एचएमसीटी (HMCT) अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागातील शैक्षणिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here