महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹९९३ कोटींच्या कामांना मंजुरी

0
40
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹९९३ कोटींच्या कामांना मंजुरीमहाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹९९३ कोटींच्या कामांना मंजुरी
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹९९३ कोटींच्या कामांना मंजुरी
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹९९३ कोटींच्या कामांना मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे राज्यातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ₹९९३ कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

 

बैठकीत राज्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धनासाठी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी मंजूर करण्यात आला.
मंजूर करण्यात आलेले प्रमुख प्रकल्प :
  • श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar Temple) परिसरातील आदर्श गाव विकासासाठी ₹१७२ कोटींची तरतूद.
  • श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग  (Grishneshwar Jyotirlinga Temple (वेरुळ)विकास आराखड्यासाठी ₹२१० कोटींची मंजुरी.
  • श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaijnath Temple) परिसर विकासासाठी ₹३०१ कोटींची तरतूद.
  • जगदगुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Janmasthan) संवर्धनासाठी ₹४१ कोटी मंजूर.
  • किल्ले अजिंक्यतारा (Ajinkyatara Fort) जतन आणि संवर्धनासाठी ₹१३४ कोटींची तरतूद.
  • महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संगम माहुली, सातारा येथील समाधी स्थळांचे संवर्धन,(Sangam Mahuli Samadhi Sthal ), पुनरुज्जीवन आणि परिसर विकासासाठी ₹१३३ कोटींची मंजुरी.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ( Sunetra Ajit Pawar), मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik), मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale), मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore), आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)  तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास यांना गती देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here