स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे बिगुल; १८ जूनला मतदान

0
39

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज प्रक्रिया, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :

  • अर्ज भरण्याची मुदत : २५ मे ते १ जून
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ४ जून
  • मतदान : १८ जून
  • मतमोजणी : २२ जून
राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी या निवडणुका होणार असून, अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे आणि उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू झाली आहे.
राजकीय पक्षांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या दृष्टीनेही या निवडणुकांकडे महत्त्वाने पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here